शेवटचे अपडेट: १८ ऑक्टोबर २०२६ | लेखक: भाऊसाहेब कोरडे
दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय?
महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२६ मध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल जाहीर केले. हे दिव्यांग व्यक्तींसाठी एकाच ठिकाणी सर्व कल्याण योजना देणारे ऑनलाईन व्यासपीठ आहे. यावर योजनेचे नाव माहीत नसले तरी चालते. तुम्ही तुमची माहिती भरली की तुम्ही पात्र असलेल्या योजना पोर्टल तुम्हाला सुचवते.
दिव्यांग हक्क अधिनियम, २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी हा दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. अर्ज, पडताळणी आणि मंजुरी ही प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने कागदी कामकाज कमी होते.
| पोर्टलचे नाव | दिव्यांग सहाय्यक पोर्टल, महाराष्ट्र |
|---|---|
| विभाग | दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन |
| लाभार्थी | महाराष्ट्रातील दिव्यांग नागरिक |
| अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाईट |
divyangsahayakportal.maharashtra.gov.in |
दिव्यांग सहाय्यक पोर्टलचे मुख्य फायदे
- सर्व दिव्यांग कल्याण योजना एकाच पोर्टलवर शोधता येतात.
- तुम्ही पात्र असलेल्या योजना पोर्टल आपोआप सुचवते.
- अर्ज घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन करता येतो.
- अर्जाची स्थिती कधीही ऑनलाईन तपासता येते.
- कार्यालयांच्या चकरा आणि कागदी कामकाज कमी होते.
- तक्रार असेल तर ऑनलाईन नोंदवता येते.
दिव्यांग सहाय्यक पोर्टल नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
नोंदणी सुरू करण्याआधी खालील कागदपत्रे तयार ठेवा. म्हणजे मध्येच थांबावे लागणार नाही.
- UDID कार्ड (दिव्यांगत्वाचे ओळखपत्र)
- आधार कार्ड
- आधारशी लिंक असलेला चालू मोबाईल नंबर
- बँक पासबुक (योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होण्यासाठी)
- पासपोर्ट साईज फोटो
आधी स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करून UDID कार्ड काढून घ्या. कार्ड मिळाल्यानंतर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करा.
दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी कशी करायची? (स्टेप-बाय-स्टेप)
स्टेप १: अधिकृत वेबसाईट उघडा
मोबाईल किंवा संगणकावर ब्राउझर उघडा आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप २: नोंदणीचा पर्याय निवडा
होमपेजवर दिव्यांग व्यक्तीसाठी असलेला नोंदणीचा पर्याय निवडा.
स्टेप ३: UDID आणि जन्मतारीख टाका
तुमचा UDID क्रमांक आणि जन्मतारीख टाकून पडताळणी करा.
स्टेप ४: OTP टाका
तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
स्टेप ५: माहिती भरा
वैयक्तिक माहिती, पत्ता आणि बँक खात्याचा तपशील नीट भरा. आधार कार्डवरील नावाप्रमाणेच माहिती भरा.
स्टेप ६: Submit करा
सर्व माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा. यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
दिव्यांग सहाय्यक पोर्टल – अधिकृत वेबसाईट
नोंदणीनंतर काय करायचे?
- लॉगिन करून तुमच्यासाठी सुचवलेल्या योजना पहा.
- ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तिच्यासाठी ऑनलाईन अर्ज करा.
- डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासा.
- काही अडचण आली तर पोर्टलवरील तक्रार सुविधा वापरा.
नोंदणी करताना या चुका टाळा
- आधार, UDID आणि बँक खात्यावरील नावात फरक असू नये.
- OTP साठी चालू असलेला आणि आधारशी लिंक असलेलाच मोबाईल नंबर वापरा.
- तुमचा OTP, UDID किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका.
- नोंदणीसाठी कोणी पैसे मागत असेल तर सावध रहा. सरकारी पोर्टलवर नोंदणी मोफत असते.
- माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवरच भरा.
दिव्यांग सहाय्यक पोर्टल: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
सरकारी पोर्टलवर नोंदणी मोफत असते. कोणी पैसे मागत असेल तर सावध रहा.
UDID लागते की नाही ते पोर्टलवर तपासा. UDID नसेल तर आधी स्वावलंबन पोर्टलवरून काढून घ्या.
तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का ते तपासा. नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर मोबाईल नंबर अपडेट करून घ्या.
पोर्टलवर लॉगिन करून डॅशबोर्डमधील अर्ज स्थिती हा पर्याय पहा.
जवळच्या CSC केंद्रावर किंवा MaziSeva कडे संपर्क करा.
निष्कर्ष
मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल दिव्यांग बांधवांसाठी सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते आणि कार्यालयांच्या चकरा वाचवते. तुमच्या ओळखीत कोणी दिव्यांग बांधव असेल तर ही माहिती त्यांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा.
अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी mazisewa.com ला रोज भेट द्या!
हे पण वाचा:
निराधार योजना |
बांधकाम कामगार योजना |
लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत?
Disclaimer: mazisewa.com ही खाजगी वेबसाईट आहे. तिचा सरकारशी किंवा कोणत्याही सरकारी खात्याशी संबंध नाही. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासा.










Leave a Reply