३०,५०० ‘कृषी मित्र’ भरती २०२६: महात्मा फुले कृषी विकास केंद्र सविस्तर माहिती
नमस्कार मित्रांनो! शेती क्षेत्रात काम करण्याची आणि स्वतःच्या गावात राहून रोजगार मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सध्या सोशल मीडियावर एक नवीन अपडेट समोर आली आहे. ‘महात्मा फुले कृषी विकास केंद्र’ यांच्यातर्फे ‘कृषी मित्र’ (Krushi Mitra Bharti 2026) या पदासाठी तब्बल ३०,५०० जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील ग्रामीण तरुणांसाठी ही संधी असल्याचे सांगितले जात आहे. या भरतीविषयीची सविस्तर माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अत्यंत महत्त्वाची सत्यता (Fact Check) खालीलप्रमाणे दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
📌 कृषी मित्र भरती 2026: थोडक्यात तपशील
| संस्थेचे नाव: | महात्मा फुले कृषी विकास केंद्र (खाजगी संस्था) |
| पदाचे नाव: | कृषी मित्र (Krushi Mitra) |
| एकूण रिक्त जागा: | ३०,५०० जागा |
| मानधन (Salary): | ₹२०,००० पर्यंत |
| संकेतस्थळ (Website): | https://mpkvk.com/ (येथे भेट देण्यापूर्वी सत्यता तपासा) |
🎓 कृषी मित्र पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- शिक्षण: उमेदवार किमान १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असावा. (कृषी पदवी किंवा कृषी डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य).
- वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे यादरम्यान असावे.
🚨 अत्यंत महत्त्वाची सूचना (Job Alert Fact Check):
कोणत्याही भरती प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी खालील गोष्टींची नोंद घ्यावी:
- ही सरकारी भरती नाही: हे नाव ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ’ किंवा सरकारी कृषी विभागाशी मिळतेजुळते असले तरी, ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत भरती नाही. ही एका खाजगी संस्थेची जाहिरात आहे.
- फसवणुकीपासून सावधान: जर अर्ज करताना किंवा निवड प्रक्रियेदरम्यान कोणतीही नोंदणी फी (Registration Fee) मागितली जात असेल, तर संस्थेची पूर्ण सत्यता तपासल्याशिवाय १ रुपयाही देऊ नका.
- खाजगी कागदपत्रे: आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करण्यापूर्वी पोर्टल सुरक्षित असल्याची खात्री करा.
🎥 या भरतीची संपूर्ण सत्यता पाहण्यासाठी खालील व्हिडिओ नक्की पहा:
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. कृषी मित्र भरती 2026 ही सरकारी भरती आहे का?
नाही, महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत निघालेली ही भरती सरकारी नसून एका खाजगी संस्थेद्वारे राबवली जात आहे.
२. कृषी मित्र पदासाठी पगार किती आहे?
जाहिरातीनुसार, या पदासाठी कामाच्या स्वरूपानुसार आणि अनुभवानुसार ₹२०,००० पर्यंत मानधन मिळू शकते.
अधिक माहिती आणि अचूक अपडेट्ससाठी:
नवीन सरकारी योजना आणि नोकरीच्या खात्रीशीर माहितीसाठी mazisewa.com ला नेहमी भेट द्या.
तसेच, इन्स्टाग्रामवर @digital.bhausaheb ला फॉलो करायला विसरू नका!




Leave a Reply