Those farmers who have not received money due to drought, don't worry, let them do this work first
ज्या शेतकऱ्यांचे पैसे आले नसेल त्यांनी आपल्या गावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपले नाव लिस्ट मध्ये आहे कि नाही याची खात्री करावी.
जर आपले नाव यादी मध्ये नसल्यास आपले आधार कार्ड व बँक खाते पुस्तकाची झेरोक्स तलाठी यांच्याकडे जमा करून द्यावी
कार्यालयात आपले डॉक्युमेंट जमा केले असता ते आपल्याला चार ते पाच दिवसांमध्ये vk नंबर देईल तो vk नंबर घेऊन आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जावे सीएससी केंद्रावर गेल्यानंतर तो नंबर केंद्र चालकास द्यावा तो नंबर दिल्यानंतर त्या नंबर वरती आपली केवायसी करून घ्यावी.
केवायसी केल्यानंतर आपल्याला केंद्र चालक सांगेल की आपल्याला किती रक्कम मिळणार आहे.
सदरील रक्कम ही सात ते आठ दिवसाच्या आत मध्ये आपल्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल.
जर जास्त दिवस झाले असल्यास आपले पैसे आपल्या खात्यात जमा झाले नसल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक https://mh.disastermanagement.mahait.org/PaymentStatus
करून आपल्याला मिळालेल्या पावतीवरचा वीके नंबर यामध्ये टाकावा यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला आपले पैसे कोणत्या बँकेत गेले याबद्दल माहिती मिळेल.
आपले पैसे जर आले नसेल तर आपण आपले आधार कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे ओनलाईन चेक करून घ्यावे
जर आपले आधार कोणत्याच बँक ला लिंक नसेल तर आपल्याला सर्वात आधी आपल्या खात्यालाआधार लिंक करावे लागेल अन्यथा आपल्याला शासनाकडून येणाऱ्या कोणत्याच योजनेचे अनुदान मिळणार नाही.
आधार लिंक असेलेल खाते सुरु असले पाहिजे व त्या बँक खात्यामध्ये आपला देनंदिन व्यवहार सुरु पाहिजे
दिलेल्या लिंक वर जाऊन आपण आपले पैसे आले का नाही व बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे जमा झाले असेल तर आपल्याला तेथे बँकेचा तपशील कोणत्या तारखेला जमा झाले हे सर्व डिटेल मध्ये दाखवेल.
Panchnama Payment Disbursement (mahait.org)
किंवा जर तेथे असे लिहून आल्यास आपल्या तहसील कार्यालयाला संपर्क साधा तर सदरील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करावे धन्यवाद
असेच नवनवीन माहिती व अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Leave a Reply